Labels

hpunix (63) marathi kavita (52) linux (21) solaris11 (10) AWS (5) numerology (5)

Thursday, February 12, 2015

DayToDay-दिनचर्या - 2

दिनचर्या 1; Day 1: 12/02/2015


देईन माझी स्पंदने.. तुला मी उधार
बस एका मिठीसाठी.. हो तु तयार


किरण जाधव


*******************************

दिनचर्या 2; Day 2: 13/02/2015


ओठांना माझ्या सखे.. ओठ तुझे बिलगले
श्वासात श्वास अन् .. सूरात सूर मिसळले


किरण जाधव

******************************** 

दिनचर्या 3; Day 3: 14/02/2015
 
मिठीत घेऊन तुला.. ओठातले या मध चाखले
संत वॅलेंटाईनच्या कृपेने.. नशीब लखलखले

किरण जाधव

Monday, February 9, 2015

Password cannot be circular shift of logonid +HPUX

Error : Password cannot be circular shift of logonid
******************************************

hpuxsrv:/> passwd kalyanjit
Changing password for kalyanjit
Last successful password change for kiren: Thu Feb  5 15:06:04 2015
Last unsuccessful password change for kiren: NEVER

New password:
Password cannot be circular shift of logonid.


Trick:


testhpux:/sbin/passwd kalyanjit
New password:
Re-enter new password:

Reason: /sbin/passwd -  it allows to change the password even if it is changed 5 minutes before also. 


Thanks...
Kalyanjit


**Let's Share our knowledge and keep visiting here**

DayToDay....दिनचर्या ;-)

दिनचर्या 1 ; Day 1 : 07/02/2015

गुलाबाच्या दिवशी गुलाबी काहीतरी...
काल तुझा सखे.. हात हाती धरला
गावात उगाच चर्चा.. गुलाब थरथरला
किरण जाधव

*******************************

दिनचर्या 2; Day 2: 08/02/2015

हुश्श प्रपोज डे आला

हा तुझा मी.. होकार समजावा की नकार
की लाजण्याचा.. तु शोधलेला नवा प्रकार

किरण जाधव

********************************

दिनचर्या 3; Day 3: 09/02/2015

तुझा पदर जरा ढळला अन्.. गावात जणु वादळ आलं
काहींच्या हृदयाचा ठोका चुकला.. इतकं नुकसान झालं

किरण जाधव.....

Wednesday, February 4, 2015

नाव सांगतो तिचं....किरण जाधव...!!!

नाव सांगतो तिचं....
***********************

शूss कुणाला बोलायच नाही 
खरचं कुणाला सांगायच नाही
गोष्ट सांगतो तुम्हाला नवी
एका मुलीवर प्रेम करतो मी
नाव सांगतो तिचं, नाव आहे "वैभवी" || 

एकाच वर्गात शिकतो आम्ही
खुप दूर-दूर बसतो आम्ही
मनाला आता एकच वाटतं
बाजुला ती बसायला हवी
नाव सांगतो तिचं, नाव आहे "वैभवी" ||

जातीनं आहे ती गुजराती
अन् मी पडलो मराठी
आता मात्र मित्रा मला
गुजराती शिकायलाच हवी
नाव सांगतो तिचं, नाव आहे "वैभवी" ||  

फिदा झाल्यावर तिच्यावर मी
तिची माझी जोडी जमायला हवी
आज आडनावानं "जोशी" असेल ती
उद्या जाधव मात्र व्हायलाच हवी
नाव सांगतो तिचं, नाव आहे "वैभवी" ||

किरण जाधव...!!! [वैभवी जोशी या काल्पनीक नावात रमताना...]

Tuesday, February 3, 2015

तुझा विरह....किरण जाधव...!!!

तुझा विरह....

मारेल हा विरह मला 
बनूनी एक जहर 
जाळेल हा विरह मला 
बनूनी ऊन्हाचा कहर...

मग,
नाही ना जाणार दूर 
मला अशी सोडूनी 
भातुकलीचा डाव उगाच 
अर्धावरती मोडूनी...




किरण जाधव...!!! [तुझ्या विरहात जळताना]