Labels

hpunix (63) marathi kavita (52) linux (21) solaris11 (11) AWS (5) numerology (5)
Showing posts with label marathi charolya. Show all posts
Showing posts with label marathi charolya. Show all posts

Tuesday, December 29, 2015

Hypocrite - 1

Hypocrite - 1


अंधश्रद्धा निर्मुलन हा त्याचा आवडता विषय. बुवाबाजी, भगतगीरी, तांत्रिक-मांत्रिक यांचे समाजात वाढलेले स्तोम ह्या विषयावर त्याचा हातखंडा.

काल्पनिक रामायण, महाभारत, मळाचा गणपती, शंकर बिंकर, शिवलींग, विष्णु फिष्णु, अमर हनम्या, फालतू मुर्तीपुजा हे शब्द त्याच्या बोलण्यात असायचेच, खुप छान बोलायचा यावर, तासनतास, अगदी पटेल असंच.

पोर होत नाही म्हणून गेले सहा महिने एका भगताचा, मांत्रिकाचा उंबरा झिजवताना पाहिलंय त्याला लोकांनी..........

#किरण_जाधव_KJ

Thursday, November 19, 2015

तुझ्याविना..!!

"तुझ्याविना"..!!

तार्यांचं चमकणं नाही आता
वार्याचं वाहणं नाही आता
फुलांचं फुलणं नाही आता
आगी विना जळणं आता
सुना सुना आसमंत झाला तुझ्याविना
नाही बहर, नुसता कहर तुझ्याविना !!

एकांत, बैचेनी आता

सरली ओठांची गाणी आता
हातातल्या विस्कटल्या रेषा
नाही त्यांची जुळणी आता
सुनं सुनं हसणं झालं तुझ्याविना
नाही बोलणं, नुसतं झुरणं तुझ्याविना !!

बंद होतील स्पंदने आता

थांबतील दाही दिशा आता
मनाचं का हे स्वैर वागणं
संपली जगण्याची आशा आता
सुनं सुनं जगणं झालं तुझ्याविना
नाही उरणं, नुसतं मरणं तुझ्याविना !!

- Kalyanjit


Tuesday, September 29, 2015

‪ऊपास‬ आहे यार आज..!!

ऊपास‬ आहे यार आज

ऊपास आहे यार आज
अंडा-बुर्जी खात नाही मी आज
सिगारेट-दारू ला शिवत नाही आज
नाॅनवेज तर नकोच नको मला आज..

तंबी एक चाय दे
(मस्त चाय चे झुरके घेत घेत)

अरे ती बघ, कसला थुलथुलीत माल आहे
आयला तिच्या शरीरावर अख्खा भुगोल आहे

बघ दोन डोंगर, दर्या उंचवटे
दोन खडकांचे घर्षण तिथे
पण साला ज्वालामुखी ईथे फुटे
(टाळ्या आणि हास्याचा फवारा)

एक साबुदाना खिचडी दे यार
.
.
ऊपासाला हे चालते यार
(मी आपला अवाक, नक्की काय)


‪- Kiran Jaddhav

Monday, September 28, 2015

एक रंडीबाज

#"एक रंडीबाज"..!!


"एक रंडीबाज" म्हणून फेमस होता तो म्हणे
कुठल्या तरी रांडेशी लग्न केलं होतं म्हणे..


लोकं दोन हात लांबच असायची त्या घरापासून
ऊलट-सुलट बोलत बसायची लपून-छपून..


कळत नव्हतं राग कसला होता लोकांना?
.
.
एक वेशा आपल्याला उपभोगाला भेटत नाही म्हणून की
आपल्यापेक्षा ती जरा जास्त पतीव्रता आहे म्हणून...


बिच्चारा.., मेला परवा एका अपघातात

हजार तरी माणसं प्रेताला आली होती म्हणे
चार-पाच तास लोकांची चालु होती भाषणे..

कोण दुवा देत होते, कोण सलाम करत होते
कधी नव्हते ते आज, त्याला प्रणाम करत होते

ती येडी रांड ऊगाच हमसून-हमसून रडत होती
.
.
ओठ सुकलेली लांडगे ऊगाच तीला बघत
सुक्या ओठांवरून जीभ फिरवत होती..


स्वप्न बघत, डोळे शेकत...

Thank U!
Kiran Jaddhav

Friday, August 7, 2015

कधी-कधी वाटतं...

कधी-कधी वाटतं...
+++++++++++

कधी-कधी वाटतं, तुझ्या ओठांवर लिहाव
पण शब्दच सापडत नाही,
कधी-कधी वाटतं, केसांवरील बटांवर लिहाव
पण शब्दच सापडत नाही....

अन सापडलेच.. तर तेच शब्द
इतर कविनी आळवलेले
लिहिलेच काहि तुझ्या स्तुतित तर
म्हणशील शब्द आहेत पळवलेले...

मग कुटून शब्द आणू
अन कुठला शब्द निवडू,
तुला लाडाने "लाडके" म्हणू
की प्रेमाने "प्रेम-वेडू"....

सुचतच नाही, सुचतच नाही
शब्द काहि सुचतच नाही,
ओठांवर येउन सुद्धा
कुंचल्यातुन बरसत नाही...

अरेच्या, पुन्हा ओठ आला
हिरव्या पानांचा देठ आला
पुन्हा केसांची बट आली
पुन्हा शब्दांची मैफल चुकली....
पुन्हा शब्दांची मैफल चुकली.... 


========================
किरण जाधव..[तुझ्या ओठांवर लिहिताना ]
========================

तीळ-गुळ

"तीळ-गुळ"...


ती फ़ोन करते, ऐन मकर-संक्रांतीच्या दिवशी
अन बोलते, अगदी लगेच ये भेटायला
मकर-संक्रांत आज, तोंड गोड करायला...

शेवटी प्रेयसी ती
जाव लागेलच भेटायला
नाहीतर कारण मिळेल
लटक-लटक रुसायला...

मी घेउन जातो तिच्यासाठी
खुप सारे "तीळ-गुळ"
तोंड गोड करतो तीच
भरवतो एक-एक "तीळ-गुळ"

ती मिश्किलपणे हसते;
कानात येउन सांगते,

"
वेडा आहेस तू,
बायकांच तोंड अस गोड करतात का?"

=============================
किरण जाधव...[तोंड गोड करताना...]
=============================

- Kirraan Jadhav

Monday, July 27, 2015

पांडुरंग तु, माझी विठू माऊली ॥

पांडुरंग तु, माझी विठू माऊली ॥

गेला एक महिना प्रयत्न करत होतो माऊलीवर काही लिहायचं, पण जमतंच नव्हतं अन् माझी-मित्रांची इच्छा हिच की आषाढी एकादशी च्या दिवसापर्यंत काही लिहावं....

बस्स माऊलीला आर्त हाक दिली अन् माऊलीच्या कृपेनेच हे काहीतरी लिहिलं... सो थॅंक्यु माऊली ॥

टाळ तु, भजनातली टाळी तु
वारकर्यांच्या ओठातील ओळी तु
कधी भेटसी तु, होऊनी अभंग
कधी भेटसी , होऊन कवाली

पांडुरंग तु, माझी विठू माऊली ॥

बाप तु, आईची ममता तु
सुर्य तु, चंद्र शितलता तु
कधी भेटसी तु, होऊन ऊन
कधी भेटसी, होऊन सावली

पांडुरंग तु, माझी विठू माऊली ॥

धन्य तु, धन-धान्य तु
पिक तु, पाऊसपाणी तु
सोडी सारं तुझ्या विश्वासावर
तुच या संसाराचा रखवाली

पांडुरंग तु, माझी विठू माऊली ॥

तुझ्या चरणी अमृत, कुशीत स्वर्ग
घेईन नाम तुझे, करूनी देहाचा मृदंग
तुझ्या एका दर्शनासाठी देवा
आतुरलेय या डोळ्यांची बाहुली

पांडुरंग तु, माझी विठू माऊली ॥

भावनांना या, तुझ्या अश्वाचा वेग दे
शब्दांना माझ्या, विठ्ठला तु जाग दे
काय लिहणार तुझ्या स्तुतीत कोणी
बस हात जोडून उभा हा मवाली

पांडुरंग तु, माझी विठू माऊली ॥


‪#‎किरण_जाधव‬ (२५_०७_२०१५)