Labels

hpunix (63) marathi kavita (52) linux (21) solaris11 (10) AWS (5) numerology (5)

Saturday, June 27, 2009

कुंकवाच्या डबीत...

कुंकवाच्या डबीत ...

त्याच वागण हे असच बेफिकीर,
अनाकलनीय, बेभान वार्र्यासारख;

एका क्षणात संसार उधळतो
शिव्यांची लाखोली वाहतो तिला
कधी तितक्याच बेशरमेन
कुशीत घेतो तिला..

त्याच्या अशा वागण्याची
सवय झालीय तिला
फक्त शरीर असत मनाशिवाय
त्याच्याबरोबर - बिछान्यावर
मनाला तर तीनं,
कधीच बंद केलय
"कुंकवाच्या डबीत" .....



किरण जाधव....[कुंकवाच्या डबीतलं मन शोधताना...]

Thursday, June 18, 2009

मृत्यूच भय... kiran jadhav

तो रडला, खूप रडला
ती गेली तेव्हा
जगायच नाही म्हणाला
ती मेली तेव्हा...

पण.. गम्मत बघा ना,
जगतोय.. अजूनही तो जगतोय
मरणाच्या गोष्टी करणारा तो
आज मरणालाच घाबरतोय...

स्पष्ट दिसत..डोळ्यात त्याच्या
सरत चाललेल वय
आणि...
...
"मृत्यूच भय"....

॥किरण जाधव॥

Wednesday, June 17, 2009

चल पावसात भिजू या... kiran Jadhav

ऐ तुला गाता येत का?

भर पावसात नाचता येत का?

मग चल ना,

आज पावसात चिंब भिजू या

एकमेकांच्या ह्रुदयात,

आज प्रेमाचे कोंब रुजवू या...

चिंब भिजल्यावर मला,

हळूच मिठीत घेशील ना

"न सांगताच"

थंड जालेल्या श्वासांना,

प्रेमाची उब देशील ना

"न मागताच"....

===========================================

किरण जाधव (12/06/2009)

===========================================

पाहून घर गळक...!!

पाहून घर गळक...!!

पाहून घर गळक
फिरत माज़ टाळक
घालतो शिव्या पावसाला
आय-बहिण काढतो त्याची...

भडकतो, तड़कतो
बेम्बिच्या देठापासून ओरडतो
रडतो, चिडतो
जिव जाईपर्यंत भांडतो...

पाउस साला नीच
एक नंबरचा हरामखोर
माझा चढलेला जोर पाहून
तो ही चढवतो जोर...

चेकाळतो साला
बरसतो..छप्पर फाटेपर्यंत
अरे मी ही कमी कुठला?
ओरडतो..उर फुटेपर्यंत...

जोर वाढतो...
छप्पर गळत, फाटत
फाटणारच होत ते
काळीज जळत, तुटत
तुटणारच होत ते...

दिसतो आता डोळ्यासमोर
चेकाळलेला पाउस कोसळणार पाणी...
अन् पावसा समोर उभा हरलेला
आणी... डोळ्यातून कोसळणार पाणी
डोळ्यातून कोसळणार पाणी....

 - Kirraan Jadhav