Labels

hpunix (63) marathi kavita (52) linux (21) solaris11 (10) AWS (5) numerology (5)

Sunday, January 27, 2019

बारा राशी आणि नक्षत्रे

बारा राशी आणि नक्षत्रे

नाक्षत्रेय पद्धत हि नक्षत्रांवर आधारित/अवलंबून आहे. नक्षत्र ही ग्रहांची संपत्ती आहे. ९ ग्रहांना प्रत्येकी ३ अशी नक्षत्रे दिले आहेत, म्हणजे एकूण २७ (९*३) नक्षत्रे आहेत.

 ग्रहांना प्लॅनेट्स किंवा भटके असे संबोधले आहे, म्हणजे ते स्थिर नाहीत ते भटकत असतात तर नक्षत्र हे स्थिर आहेत.
नक्षत्र म्हणजे "न क्षरती इती नक्षत्र:"

प्रत्येक नक्षत्राची व्याप्ती ही  १३ अंश २० कला (८०० कला) इतकी आहे.

१२ राशी आणि त्यातील नक्षत्रे व त्यांची चरणे पुढीलप्रमाणे:

राशी               नक्षत्रे

मेष                 अश्विनी (४ चरण), भरणी (४ चरण), कृतिका (१ चरण)

वृषभ               कृतिका (३ चरण), रोहिणी (४ चरण), मृग (२ चरण)

मिथून              मृग (२ चरण), आद्रा (४ चरण), पुनर्वसू (३ चरण)

कर्क                पुनर्वसू (१ चरण), पुष्य (४ चरण), आश्लेषा (४ चरण)

सिंह                 मघा (४ चरण), पूर्वाफाल्गुनी (४ चरण),  उत्तराफाल्गुनी (१ चरण)

कन्या               उत्तराफाल्गुनी (३ चरण), हस्त (४ चरण), चित्रा (२ चरण)

तूळ                  चित्रा (२ चरण), स्वाती ( ४ चरण), विशाखा (३ चरण)

वृश्चिक              विशाखा (१ चरण),  अनुराधा ( ४ चरण), जेष्ठा (४ चरण)

धनू                   मूळ (४ चरण), पूर्वाषाढा (४ चरण), उत्तराषाढा (१ चरण)

मकर                उत्तराषाढा (३ चरण), श्रवण (४ चरण),  धनिष्ठा (२ चरण)

कुंभ                  धनिष्ठा (२ चरण), शततारका (४ चरण), पूर्वाभाद्रपदा (३ चरण)

मीन                  पूर्वाभाद्रपदा (१ चरण), उत्तराभाद्रपदा (४ चरण), रेवती (४ चरण)


प्रत्येक राशीत सव्वादोन नक्षत्रांचा समावेश असतो. प्रत्येक नक्षत्राचे एकूण ४ चरण असतात (प्रत्येक चरण ३ अंश २० कलेचे असते). म्हणजेच एका राशीत तीन नक्षत्रांची मिळून ९ चरणे होतात.

राशी व त्यामध्ये येणारी नक्षत्रे कधीही बदलत नाहीत. उदा: मेष राशीत अश्विनी, भरणी नक्षत्र येईल. ते ईतर राशीत येणार नाही. कृतिका नक्षत्राचे १ चरण मेष राशीत तर उरलेली ३ चरणे वृषभ राशीत येतील.



Thanks,
Kiraan B Jadhav

Friday, January 11, 2019

राशी आणि राशी स्वामी

राशी आणि राशी स्वामी

मागच्या पोस्ट मध्ये आपण अंक आणि त्यांचे स्वामी पाहिलेत, आता आपण राशी आणि त्यांचे स्वामी पाहणार आहोत.

ज्योतिषशास्त्रात एकूण बारा राशी आहेत आणि प्रत्येक राशीला त्या राशीचे स्वामी नेमून दिले आहेत. बारा राशींना अनुक्रमे ७ ग्रह खालीलप्रमाणे विभागून दिले आहेत.


कुंडली स्थाने     राशी       राशी स्वामी
१                      मेष           मंगळ
२                      वृषभ        शुक्र
३                       मिथून      बुध
४                      कर्क        चंद्र
५                      सिंह         रवी
६                      कन्या       बुध
७                      तूळ         शुक्र
८                       वृश्चिक     मंगळ
९                       धनू         गुरु
१०                     मकर       शनी
११                    कुंभ         शनी
१२                   मीन          गुरु

(जन्मपत्रिकेचे एकंदर १२ भाग केले आहेत, त्यांना भाव किंवा स्थाने म्हणतात. पहिले स्थान हे मेष राशीच्या किंवा मंगळ ग्रहाच्या अमलाखाली येते. यावर सविस्तर माहिती आपण पुढच्या पोस्ट मध्ये घेऊ. )

मेष आणि वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे. वृषभ आणि तूळ राशीचा स्वामी शुक्र आहे.
मिथून आणि कन्या राशीचा स्वामी हा बुध आहे. धनु आणि मीन राशींचा स्वामी हा गुरु आहे तसेच  मकर आणि कुंभ राशीचा स्वामी हा शनी आहे.

सिंह राशीचा स्वामी हा रवी आहे. तर कर्क राशीचा स्वामी हा चंद्र आहे. (रवी आणि चंद्र या दोन्ही राशी स्वामींना प्रत्येकी एक-एक राशी देण्यात आली आहे. )

गुरु ग्रह हा उत्पत्तीचा, नवनिर्मितीचा कारक आहे तर शनी हा मृत्यूचा कारक आहे. म्हणून या दोन ग्रहांना खूप महत्व आहे. जर दोन्ही ग्रहांच्या अंकांची बेरीज केली तर ती एक सारखी येईल.

शनी = मकर (१०) + कुंभ (११) = २१
गुरु = धनू (९) + मीन (१२) = २१


धन्यवाद:
Kalyanjit





Thursday, January 3, 2019

अंक आणि त्यांचे स्वामी...

अंक आणि त्यांचे स्वामी.... 

अंक आणि त्यांचे स्वामी ओळखणे खूप गरजेचे आहे आपण म्हणू शकतो कि हि एक बेसिक स्टेप आहे ज्योतिष शिकणाऱ्यांसाठी (मी जस्ट सुरु केलंय ज्योतिष शिकणं ). प्रत्येक अंकाला एक स्वामी नेमून दिला आहे. 

ज्योतिषशात्रात एकूण ९ ग्रह आहेत, ते खालीलप्रमाणे :

रवी , चंद्र, मंगळ, बुध , गुरु, शुक्र, शनी, राहू अन केतू 

यापैकी रवी ते शनी हे ग्रह आपल्याला आकाशात दिसतात म्हणून त्यांना "दृश्य ग्रह" असे म्हणतात तर राहू आणि केतू हे ग्रह नाहीत तर पृथ्वी आणि चंद्र यांच्या भ्रमण मार्गातील छेदन बिंदू आहेत पण  ज्योतिषशात्रात त्यांना ग्रहांचा दर्जा दिला आहे. 

(केपी ऍस्ट्रोलॉजि मध्ये राहू आणि केतू यांना Nodes असे म्हटले आहे, व त्यांना अनन्यसाधारण महत्व दिले आहे. कारण ग्रहांपेक्षा जोरदार फळे हे दोन छेदनबिंदू देतात, म्हणून म्हटले आहे "Nodes are stronger than planets". 

अंक -- त्यांचे स्वामी 
१  --      रवी (सूर्य)
२ --       चंद्र 
३ --       गुरु 
४ --      राहू 
५ --      बुध 
६  --     शुक्र 
७  --     केतू 
८  --      शनी 
९ --       मंगळ 
० --       पृथ्वी 

(आपण पुर्थ्वी वर राहतो म्हणून आपण पृथ्वी ला रेफेरेंस पॉईंट म्हणून घेतले आहे. जर आपण मंगळावर राहत असतो तर मंगळाला रेफेरेंस म्हणून घेतले असते अन आपण पृथ्वी या ग्रहाचा विचार केला असता. )

ग्रह   --  त्यांचे अंक 

रवी  --     १
चंद्र --      २
मंगळ --   ९
बुध --       ५
गुरु  --      ३
शुक्र --     ६
शनी --     ८
राहू  --     ४
केतू --      ७
पृथ्वी  --    ०


ग्रह आणि त्यांचे अंक यांचा उपयोग अंकशास्त्र (Numerology) यात होतो. ढोबळमानाने पाहायला गेलो तर, २०१९ हे वर्ष कुणाच्या/ कोणत्या ग्रह स्वामींच्या आधिपत्या खाली येते, ते पाहूया :

२०१९ = २+०+१+९ = १२=३
आता ३ ह्या अंकाचा स्वामी आहे गुरु, म्हणजे २०१९ हे वर्ष गुरु ग्रहाच्या अधिपत्याखाली असेल. म्हणजे गुरु ग्रहाची उपासना किंवा मंत्र जप केला तर फायदेशीर ठरेल. 


धन्यवाद:
किरण जाधव