आई खरचं उगाचंच....
इतकं नाही मोठं कर्तृत्व माझं,
आभाळाएवढं
आई उगाच मला,
"ध्रृव तारा" म्हणते...
इतकं नाही मोठं बोलणं माझं,
झंझावती
आई उगाच मला,
जळता निखारा म्हणते...
इतका नाही करत दगदग मी,
थकेपर्यंत
आई उगाच मला,
शांत निज पाखरा म्हणते...
इतका नाही जात भेटायला मी,
वृद्धाश्रमात
आई उगाच मला,
उतारवयाचा सहारा म्हणते...
किरण जाधव... (आई खरचं उगाचंच)
इतकं नाही मोठं कर्तृत्व माझं,
आभाळाएवढं
आई उगाच मला,
"ध्रृव तारा" म्हणते...
इतकं नाही मोठं बोलणं माझं,
झंझावती
आई उगाच मला,
जळता निखारा म्हणते...
इतका नाही करत दगदग मी,
थकेपर्यंत
आई उगाच मला,
शांत निज पाखरा म्हणते...
इतका नाही जात भेटायला मी,
वृद्धाश्रमात
आई उगाच मला,
उतारवयाचा सहारा म्हणते...
किरण जाधव... (आई खरचं उगाचंच)
- Kirraan Jadhav
No comments:
Post a Comment