Labels

hpunix (63) marathi kavita (52) linux (21) solaris11 (11) AWS (5) numerology (5)

Monday, September 28, 2015

एक रंडीबाज

#"एक रंडीबाज"..!!


"एक रंडीबाज" म्हणून फेमस होता तो म्हणे
कुठल्या तरी रांडेशी लग्न केलं होतं म्हणे..


लोकं दोन हात लांबच असायची त्या घरापासून
ऊलट-सुलट बोलत बसायची लपून-छपून..


कळत नव्हतं राग कसला होता लोकांना?
.
.
एक वेशा आपल्याला उपभोगाला भेटत नाही म्हणून की
आपल्यापेक्षा ती जरा जास्त पतीव्रता आहे म्हणून...


बिच्चारा.., मेला परवा एका अपघातात

हजार तरी माणसं प्रेताला आली होती म्हणे
चार-पाच तास लोकांची चालु होती भाषणे..

कोण दुवा देत होते, कोण सलाम करत होते
कधी नव्हते ते आज, त्याला प्रणाम करत होते

ती येडी रांड ऊगाच हमसून-हमसून रडत होती
.
.
ओठ सुकलेली लांडगे ऊगाच तीला बघत
सुक्या ओठांवरून जीभ फिरवत होती..


स्वप्न बघत, डोळे शेकत...

Thank U!
Kiran Jaddhav

No comments:

Post a Comment