Labels

hpunix (63) marathi kavita (52) linux (21) solaris11 (11) AWS (5) numerology (5)

Wednesday, January 21, 2015

हो, तुला मी विसरलेय... किरण जाधव

**हो, तुला मी विसरलेय**

हो, तुला मी विसरलेय
आता थोडीशी सावरलेय ,
तुझ्या आठवणींचे तण उपटूनी
बघ पुन्हा एकदा बहरलेय …

तुझ्यासाठी मी का झुरावं  ?
क्षण-क्षण जगताना का मरावं ?
 खोट्या स्वप्नांच्या दगडाला चिकटून
माझं आयुष्य शेवाळ का करावं ?...

मी तुला फसवा म्हणत नाही
मी तुला भ्याड म्हणत नाही,
पण तु माझा नाहीस हे म्हणताना
पहिल्यासारखी कण्हत नाही…
बघ खरच आता कण्हत नाही



किरण जाधव...!!!

No comments:

Post a Comment