रडणे माझे फसवे
नाही…
मन माझं का
थकलं
माझं असं काय
चुकलं ,
स्पंदने सारी हरवली
कुठे
हृद्याचं धडधडणं का हुकलं...
पाय जडावलेत पुन्हा
अंगात आता त्राण
नाही,
ऊरी सलतंय खोलवर काही
घुसलेला आत बाण
नाही…
पापण्या ओलावल्यात जरी
पण डोळ्यांमध्ये
आसवे नाही,
वाटे जरी हे
सारे खोटे
पण रडणे माझे
फसवे नाही..
खरचं फसवे नाही…
किरण जाधव...!!!
{ पुरूष ही रडतो कधी-कधी ;-) }
{ पुरूष ही रडतो कधी-कधी ;-) }
No comments:
Post a Comment