Labels

hpunix (63) marathi kavita (52) linux (21) solaris11 (11) AWS (5) numerology (5)

Wednesday, April 8, 2015

बस हा शेवटचा पेग संपु दे ... Kiran Jaddhav

बस हा शेवटचा पेग संपु दे 


दोन हात करेन मी ही, तुझ्याशी संकटा
बस हा शेवटचा पेग संपु दे ॥

फडकवेन झेंडा मी ही, लाल किल्ल्यावरती
बस हा शेवटचा पेग संपु दे ॥

लिहायला लावेन पुन्हा नशीब, तुला सटवाई
बस हा शेवटचा पेग संपु दे ॥

राख-रांगोळी करेन तुझी, तुझ्यासारखीच मदिरे
बस हा शेवटचा पेग संपु दे ॥

किरण जाधव.....(संपणारे पेग बघताना)


Thank you !
Kiran Jaddhav

Sunday, April 5, 2015

आई खरचं उगाचंच....

आई खरचं उगाचंच.... 

इतकं नाही मोठं कर्तृत्व माझं, 
आभाळाएवढं
आई उगाच मला, 
"ध्रृव तारा" म्हणते...

इतकं नाही मोठं बोलणं माझं, 
झंझावती
आई उगाच मला, 
जळता निखारा म्हणते...

इतका नाही करत दगदग मी, 
थकेपर्यंत
आई उगाच मला, 
शांत निज पाखरा म्हणते...

इतका नाही जात भेटायला मी, 
वृद्धाश्रमात
आई उगाच मला, 
उतारवयाचा सहारा म्हणते...

किरण जाधव... (आई खरचं उगाचंच)

- Kirraan Jadhav