Labels

hpunix (63) marathi kavita (52) linux (21) solaris11 (11) AWS (5) numerology (5)

Monday, July 27, 2015

पांडुरंग तु, माझी विठू माऊली ॥

पांडुरंग तु, माझी विठू माऊली ॥

गेला एक महिना प्रयत्न करत होतो माऊलीवर काही लिहायचं, पण जमतंच नव्हतं अन् माझी-मित्रांची इच्छा हिच की आषाढी एकादशी च्या दिवसापर्यंत काही लिहावं....

बस्स माऊलीला आर्त हाक दिली अन् माऊलीच्या कृपेनेच हे काहीतरी लिहिलं... सो थॅंक्यु माऊली ॥

टाळ तु, भजनातली टाळी तु
वारकर्यांच्या ओठातील ओळी तु
कधी भेटसी तु, होऊनी अभंग
कधी भेटसी , होऊन कवाली

पांडुरंग तु, माझी विठू माऊली ॥

बाप तु, आईची ममता तु
सुर्य तु, चंद्र शितलता तु
कधी भेटसी तु, होऊन ऊन
कधी भेटसी, होऊन सावली

पांडुरंग तु, माझी विठू माऊली ॥

धन्य तु, धन-धान्य तु
पिक तु, पाऊसपाणी तु
सोडी सारं तुझ्या विश्वासावर
तुच या संसाराचा रखवाली

पांडुरंग तु, माझी विठू माऊली ॥

तुझ्या चरणी अमृत, कुशीत स्वर्ग
घेईन नाम तुझे, करूनी देहाचा मृदंग
तुझ्या एका दर्शनासाठी देवा
आतुरलेय या डोळ्यांची बाहुली

पांडुरंग तु, माझी विठू माऊली ॥

भावनांना या, तुझ्या अश्वाचा वेग दे
शब्दांना माझ्या, विठ्ठला तु जाग दे
काय लिहणार तुझ्या स्तुतीत कोणी
बस हात जोडून उभा हा मवाली

पांडुरंग तु, माझी विठू माऊली ॥


‪#‎किरण_जाधव‬ (२५_०७_२०१५)

No comments:

Post a Comment