पाहून घर गळक...!!
पाहून घर गळक
फिरत माज़ टाळक
घालतो शिव्या पावसाला
आय-बहिण काढतो त्याची...
भडकतो, तड़कतो
बेम्बिच्या देठापासून ओरडतो
रडतो, चिडतो
जिव जाईपर्यंत भांडतो...
पाउस साला नीच
एक नंबरचा हरामखोर
माझा चढलेला जोर पाहून
तो ही चढवतो जोर...
चेकाळतो साला
बरसतो..छप्पर फाटेपर्यंत
अरे मी ही कमी कुठला?
ओरडतो..उर फुटेपर्यंत...
जोर वाढतो...
छप्पर गळत, फाटत
फाटणारच होत ते
काळीज जळत, तुटत
तुटणारच होत ते...
दिसतो आता डोळ्यासमोर
चेकाळलेला पाउस कोसळणार पाणी...
अन् पावसा समोर उभा हरलेला
आणी... डोळ्यातून कोसळणार पाणी
डोळ्यातून कोसळणार पाणी....
- Kirraan Jadhav
No comments:
Post a Comment