सारी स्वप्नं विरून गेली, सुखी संसाराची
आता आहे सोबत मला, केवळ अंधाराची ॥
हातांमध्ये हात गुंफूनी
पाहिला होता अथांग सागर
मला कळेना कधी चाखली
तुझ्या आेठातील खडीसाखर
आता आहे सोबत मला, केवळ अंधाराची ॥
हातांमध्ये हात गुंफूनी
पाहिला होता अथांग सागर
मला कळेना कधी चाखली
तुझ्या आेठातील खडीसाखर
सारी स्वप्नं कडू झाली, अपुल्या प्रणयाची
आता आहे सोबत मला, केवळ अंधाराची ॥
पाहिले होते स्वप्नात मी
सप्तपदी भोवती फिरताना
सौभाग्यकुंकू तुझ्या कपाळी
माझ्या हातांनी भरताना
सारी स्वप्नं जळून गेली, अपुल्या लग्नाची
आता आहे सोबत मला, केवळ अंधाराची ॥
इच्छा तुझी हे इवलं घर
आपण दोघांनी सजवायचं
एकच प्राजक्ताचं फुल
आेंजळीत दोघांच्या फुलवायचं
सारी स्वप्नं स्वप्न राहिली, सुखी संसाराची
आता आहे सोबत मला, केवळ अंधाराची ॥
किरण जाधव...
(प्रचंड जुनी कविता....!!!)
आता आहे सोबत मला, केवळ अंधाराची ॥
पाहिले होते स्वप्नात मी
सप्तपदी भोवती फिरताना
सौभाग्यकुंकू तुझ्या कपाळी
माझ्या हातांनी भरताना
सारी स्वप्नं जळून गेली, अपुल्या लग्नाची
आता आहे सोबत मला, केवळ अंधाराची ॥
इच्छा तुझी हे इवलं घर
आपण दोघांनी सजवायचं
एकच प्राजक्ताचं फुल
आेंजळीत दोघांच्या फुलवायचं
सारी स्वप्नं स्वप्न राहिली, सुखी संसाराची
आता आहे सोबत मला, केवळ अंधाराची ॥
किरण जाधव...
(प्रचंड जुनी कविता....!!!)
No comments:
Post a Comment