Labels

hpunix (63) marathi kavita (52) linux (21) solaris11 (10) AWS (5) numerology (5)

Monday, June 8, 2015

आई मला भूक लागलेय... किरण जाधव

आई मला भूक लागलेय

"आई पोटात आग लागलेय
आई मला भूक लागलेय"

असं काहीतरी ओरडत
शाळेतून घरी शिरायचो
आईला बिलगायचो...

आई ने जेवायला वाढायचं ना?
ती उगाच मला जवळ घ्यायची
केसावरून हात फिरवायची

मग कळायचं मला
रिकाम्या भांडयांकडं बघत, आसवं लपवत, नशीबाला दोष देत
ती काय बोलेल ते
"आज पण जेवण नाय केलंय बाळा"

रोजचंच वाक्य तीचं ते..
साला देवानं भूक दिली होती
आणि अक्कल ही
अक्कलच द्यायचीस ना देवा
भूक उगाच का दिलीस देवा...

आईचा रडवेला आवाज ऐकून
मी अजुन घट्ट कुशीत शिरायचो तिच्या

आई उपाशी पोटावरून हात फिरवत म्हणायची
"ओला रूमाल ठेऊया पोटावर
पोटाची आग शमेल.. भूक मरेल"

मी अजुन घट्ट आईच्या कुशीत
तिच्या पोटाचे ठोके ऐकत...!!!

किरण जाधव (आईला बिलगलेला)

No comments:

Post a Comment