**सकाळी कशी नीजतात ही फुलं...**
इथं फुलांचा बाजार मांडला जातो,
नेहमीच फुलं विकली जातात
काही बिछान्यात सजली जातात
काही बिछान्यातच कुस्करली जातात...
फ़ुलांच वागणं वेगळं - दिसणं नीराळं,
काही दिसायला लाल-लाल, काही मस्त पिवळी
मध्येच एखादी कळी कोवळी, निळी-निळी...
काही हातोहात संपणारी फुलं,
काही चंद्राचे चटके सोसणारी फुलं
काही उगाच सजणारी - लाजणारी फुलं
काही नशीब फ़ाटके लपवणारी फुलं...
ऐकलयं, रात्रीचीच फुलतात ही फुलं,
बिछान्यात अलगद सजतात ही फुलं
पण रात्रभर बिछान्यात असूनही
सकाळी कशी नीजतात ही फुलं...
सकाळी कशी नीजतात ही फुलं..!!
किरण जाधव... [ एका फुलात मला इतकं दिसतं..!! ]
No comments:
Post a Comment