Labels

hpunix (63) marathi kavita (52) linux (21) solaris11 (11) AWS (5) numerology (5)

Friday, December 13, 2013

आज "वॅलेंटाइन डे"... Kalyanjit

आज "वॅलेंटाइन डे"...
========================

आज "वॅलेंटाइन डे"
तू असच हसत रहावस
स्वप्नातही राणी
केवळ मलाच पहावस, 
पाहशील ना...

आज वॅलेंटाइन डे
तू असच प्रीतगुज करावस 
ओठात लपलेले शब्द माझ्या 
तुझ्या ओठांनी तू टीपावस,
टिपशील ना...

आज वॅलेंटाइन डे
तू हृदयाच्या जवळ असावीस
हातात घट्ट हात तुझा
अन अलगद मिठीत यावीस,
येशील ना...

- Kalyanjit 

Tuesday, December 10, 2013

हसण तुझं....

हसण तुझं....
+++++++++

इन्द्रधनुषी ओठ तुझे, सप्तरंगी लिपस्टिक त्यावर
शुभ्र मोती बरसण, हलक-हलक हसण त्यावर...

अशी तुझी हसण्याची त~हा
जणू फुललेला मोगरा
वार होती हृदयावर
ओठी जणू सुगंधी सुरा...

असेल कुणाच्या नयनी जादू
तुझ्या ओठी तर आहे कमान
घायाळ तर होणारच सखे
झेलूनी हे ओठातले बाण...

[ओठातले बाण ? हो, नयनातले बाण खुप झाले, आता वेळ आहे ओठांची....
तुझ्या ओठांमधे अमृत आहे
तुझ्या ओठांमधे जहर आहे
जरा निरखून पहा या ओठांत
गोड आठवणींचे शहर आहे... ]

अशी गोड हसतेस तू
क्षणात जग जींकतेस तू
नाजुक या हृदयावर
क्षणात ताबा मीळवतेस तू...

जाणवते मग...
नेपोलियन वेडा होता ते
जग जिंकायला आयुष्य गमावल
क्षणात जग जिंकला असता तो
जर एकदा तरी, हसला असता तो
तुझ्यासारखा हसला असता तो.....


===========================
किरण जाधव..[हसण तुझं आठवताना...]
===========================

सखे असाच हातात...

सखे असाच हातात...
+++++++++++++

सखे असाच हातात, दे हात तू गं मला
जन्मोजन्मीची साजणी, अशी साथ दे तू मला||

तुझा हात-हाती आला,
नभी चंद्र जसा आला
फुलपाखरांचा थवा
माझ्या अंगणात आला
कसा नकळत राणी, ऋतू कुस बदलला
जन्मोजन्मीची साजणी , अशी साथ दे तू मला||

तुझ्या हाताचा तो स्पर्श,
मनी वाढतो गं हर्ष
अपुल्या पहिल्या प्रेमाचं
राणी पहिलच वर्ष
कसा नकळत राणी, मला स्पर्श उमगला
जन्मोजन्मीची साजणी , अशी साथ दे तू मला||

तुझ्या हाताच्या त्या रेषा,
जणू प्रेमाचीच भाषा
भाव मनात प्रेमाचा
उमलू दे हीच आशा
कसा नकळत राणी, मला सूर बिलगला
जन्मोजन्मीची साजणी , अशी साथ दे तू मला||

सखे असाच हातात, दे हात तू गं मला
जन्मोजन्मीची साजणी, अशी साथ दे तू मला||

=================================
किरण जाधव..[सखीच्या हातात स्वत:ला हरवताना..]
=================================

माझ्या काही चारोळ्या...4

माझ्या काही चारोळ्या "प्रीतचाहुल" अन् "स्वप्न" या पुस्तकातून...


1. फरक कुठे पडतो 
   कोकिळ गातों की कोकिळा,
   रसिकांनी ऐकावा फ़क्त 
   गाणार्याचा गोड गळा... 

2. कृष्णाची बासरी 
    राधेच नर्तन, 
   झुरणार्या मीरेच 
   एकांतात मरण...

3. कोण म्हणतं या जगात
   सारी नाती भ्रष्ट आहेत, 
   हृदयाच्या तारा छेडून बघा 
   सुर किती स्पष्ट आहेत...

4. प्रेमात जात-धर्मं नसते 
   हे सारयानी जाणलय,
   तरीही माझ्या प्रेमाआड 
  जातीचं कुंपण उभं राहिलय... 

===========================
किरण जाधव...[चारोळ्यात रमणारा...] 
=============================

माझ्या काही चारोळ्या...3

माझ्या काही चारोळ्या "प्रीतचाहुल" अन् "स्वप्न" या पुस्तकातून...

1. प्रीतचाहुल लागल्यापासून 
   मी किनारयावर भटकतोय, 
   रेघोट्या मारलेल्या वाळुतही 
   तुझंच नाव शोधतोय .....

2. माणसांनो आता तरी 
   माणुसकीने वागा 
   थोडी शरम असेल तर 
   खाल्ल्या मिठाला जागा ....

3. लाजाळु अन तुझा चेहरा 
    अगदीच सारखा 
   एकदा लाजलीस की पहायला
   घ्याव्या लागतात तारखा ....


4. भावनांचा पुर 
   सुखा-दुखांची लहर 
   मनाच्या किनारयावर 
   आठवणींचे शहर .... 


===========================
किरण जाधव...[चारोळ्यात रमणारा...] 
=============================

माझ्या काही चारोळ्या...2

माझ्या काही चारोळ्या "प्रीतचाहुल" अन् "स्वप्न" या पुस्तकातून...

1. वाट चुकलेल्याला तुम्ही 
   घरचा रस्ता दाखवाल
   पण घरच नसलेल्याला 
   तुम्ही कुठे पोहोचवाल?.. 

2. काल एक जोड़पं 
   कातळामागे बसलेल पाहिलं 
  ओठांचे गुज ओठांनी 
  घेताना मी पाहिलं...

3. सज्जनता हा धर्मं होता 
   फार पूर्वीच्या काळी
   आज सज्जनालाच तुडवतात
   तुमच्या-आमच्या गल्लोगल्ली.. 

4. मनापासून मन जाणणारी
    माणसं असतात कमी
    कमी म्हणजे अगदीच दुर्मिळ
    याची मी देतो हमी... 


===========================
किरण जाधव...[चारोळ्यात रमणारा...] 
=============================

प्यार माझा...

प्यार माझा...
+++++++

मी वेडा आहे
पण वाईट मुळीच नाही
घरात मेणबत्ती आहे
पण लाइट मुळीच नाही
 
[आता मुंबई म्हटले तर लोड-शेडिंग आलेच ना राव...]

मी दिवस बनेन तू रात्र हो ,
नको, तू दिवस हो, मी रात्र होइन
दिवसा तुझा लख्ख प्रकाश अन
रात्री माझा मिट्ठ काळोख असेल
 
[काय कळतय ना, काळोख कशाला ते ???]

दिवसा तू घर सजवशील
अन काम करून थकशील
विसाव्यासाठी मात्र हळूच
माझ्याच कुशीत शिरशील
[का? ते विचारू नको... ]

मग, प्रेमावरच जगु आपण दोघ
कारण खिशात माझ्या पैसा नाही 

[कवीकड़े पैसा असतो कुठे? काय मंडळी बरोबर ना]

मग काय, प्रेमावरच जगु आपण दोघ
कारण खिशात माझ्या पैसा नाही
कोणी काहीही म्हणो मला
पण प्यार माझा एैसा-वैसा नाही ...
पण प्यार माझा एैसा-वैसा नाही

- Kiran Jaddhav
=================================
किरण जाधव..[प्यार और आपण दोघ ..]
================================= 

Friday, December 6, 2013

पावित्र्य...

 पावित्र्य...
+++++++++

मी कशाला करू? तारीफ तुझी - तुझ्या सोंदर्याची
उधाणलेल्या दर्याची, अंगभर सजलेल्या देहाची...

पाहत असशिलच स्वतःला आरशात
शंभर वेळा दिवसातून
जात असशील हुरळुन
स्वतःच गोर रूप पाहून...

नाहीतर तारीफ करायला आहेतच
तुझे मित्र, आजुबाजुचे लोक
त्यांच्या रोखलेल्या नजरा...
त्यांची तरी काय चुक?
नुसत वासानेच कळत
फुलून आलाय मोगरा...

पण लक्षात ठेव,
आयुष्यभर सोंदर्य टिकवता येत नाही
जमलच तर बघ
निदान पावित्र्य टिकवता येत का?

=================================
किरण जाधव..[पावित्र्य-प्रेमाच्या शोधात..]
=================================  

Wednesday, December 4, 2013

खराखुरा पाऊस....

खराखुरा पाऊस....
+++++++++++


तसा पाऊस येतो अन जातो
पण लक्षात काही राहत नाही
कारण कुठल्याच मुलीबरोबर मी
एकाच छत्रीतून जात नाही॥

तीच्या बरोबरचा अनुभव
थोडा वेगळा होता
कधी पाऊस रिमझीम तर
कधी कोसळत होता...

मुसळधार पाऊसही
हवाहवा वाटत होता
छत्रीत ती होती म्हणून
पाऊस नवानवा भासत होता॥

छत्री होती एक
पाऊस होता मुसळधार
आणि त्या पावसात
ती भिजली होती पार...

ओलेचिंब कपडे झाले
तिचे अन माझे
केसांतून झंरणारं पाणी
पाहत होते मन माझे॥

तिचा तो गुलाबी ड्रेस
पाण्यानं पार भिजला होता
एकांत भासणरा रस्ताही
कस्तुरी गंधान सजला होता...

कधी ओढणी सावरत होती,
कधी केस सुकवत होती
माझी नजर होती तिच्यावर
ती मात्र ती चुकवत होती॥

तिला पाहुन छत्री सुटत होती
कधी सुटत होता मनावरचा ताबा
तिच्या मनात साधी रिमझीम तरी
इथं माझ्या मनात, प्रेमाचा धबधबा...

कधी वाटलं हातात हात घेऊ का?
कधी वाटलं मिठीत घेऊ का?
चेहर्यावरून ओघळणारं पाणी
ओठानं मनसोक्त पिऊ का? ॥

शक्य नव्हतं ते सारं
अंगात भिनलं होतं प्रेमाचं वारं
बेभान करत होता ऋतू मला
हसत होती सर माझ्यावर...

अचानक वीज चमकली
घाबरून बाहुपाशात आली माझ्या
त्यावेळी असं वाटलं
भर दुपारी चंद्र, घरी आला माझ्या॥

सारा आसमंत
माझ्यासारखाच प्रेमानं भिजला होता
खरंच पहिल्यांदा वाटलं
खराखुरा पाऊस आला होता
खराखुरा पाऊस बरसला होता....

======================================
किरण जाधव...[तिच्याबरोबर एकाच छत्रीतून जाताना...]
======================================